Positive Stories

15-Dec-2021

गहाळ/ चोरी/ घरफोडी/ दरोडा मध्ये गेलेला माल एकूण 50 तक्रारदार यांचा मुद्देमाल परत करण्यात आला

वाशिम पोलीस दलाचे वतीने सन 2021 मधील फिर्यादी यांचे गहाळ/ चोरी/ घरफोडी/ दरोडा मध्ये गेलेला माल पोलीसांकडून हस्तगत करण्यात आला असून आज रोजी एकूण 50 तक्रारदार यांचा 1.1 कोटी रुपयाचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. असा अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करून लवकरात लवकर फिर्यादीस परत करण्याचा प्रयत्न चालू राहील.

13-Dec-2021

नागरतास येथे बेवारस पडलेली बॅग मालक सत्येश्र्वर अंभोरे यांना परत केल्याने पोलीसांचे आभार मानले

पोलीस स्टेशन मालेगाव हद्दीतील नागरतास येथून डायल 112 वर कॉल आला की, सदर ठिकाणी बेवारस बॅग पडलेली आहे त्यावरून डायल 112 चे ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार हे घटनास्थळी जाऊन त्यांनी बॅग ची तपासणी केली असता त्यात एक मोबाईल व रोख रक्कम 60000 रू मिळून आले सदर बॅग मालक सत्येश्र्वर अंभोरे यांचा शोध घेऊन मोबाईल व रक्कम परत केल्याने अंभोरे यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

11-Dec-2021

दोन बाल कामगारांना पिळवणूक होण्यापासून वाचविण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन मालेगाव हद्दीत पोलीस व सरकारी कामगार अधिकारी यांचे संयुक्त पथकाने दोन आस्थापना धारक यांचे विरुद्ध बाल कामगार अधिनियम प्रमाणे कार्यवाही केली असून या कारवाही मध्ये दोन बाल कामगारांना पिळवणूक होण्यापासून वाचविण्यात आले आहे. तसेच असे बाल कामगार कामाकरीता ठेऊ नयेत व असे बाल कामगार आढळून आल्यास माहिती देणे बाबत आवाहन करण्यात आले.

04-Dec-2021

मं.पीर येथील PI जगदाळे व स्टाफ यांनी निराधार तीन चिमुकल्यांसह मातेला शोधून दिला नातेवाईकांचा आसरा.

04-Dec-2021

चोरी प्रकरणातील एकूण 05 आरोपी अटक केले असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

03-Dec-2021

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन अवघ्या 48 तासात दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली आहे.

29-Nov-2021

कोंबिंग ऑपरेशन राबवुन दोन तलवार बाळगणारे चार आरोपीस अटक करण्यात आली आहे.

28-Nov-2021

वाशिम पोलिस- गुन्हेशोधक श्वान लुसीचे तपासात उत्कृष्ठ योगदान.

23-Nov-2021

कारंजा येथे मुलीने ई-मेल करून मदत मागितली. निर्भया पथकाने तात्काळ पोहचून तक्राररीचे निरसन केले.

20-Nov-2021

चोरीच्या प्रकरणातील आरोपीचा शिताफीने शोध घेऊन तीन आरोपी अटक, गुन्ह्यातील माल जप्त केला आहे.