Positive Stories




26-Dec-2021
खुनासह दरोड्यातील मुख्य आरोपीस 2 कट्टे व 2.4 लाख रू.चा मुद्देमाल सह अटक केली.
मा. पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनात पोनि. श्री. धुमाळ व पथकाने मालेगाव येथील खुनासह दरोड्यातील मुख्य आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेले 2 कट्टे व 2.4 लाख रू.चा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

24-Dec-2021
पोलीस स्टेशन मंगरूळपीर - पाठलाग करून चोरट्या सह एकूण सात जनावरे ताब्यात घेतली
पोलीस स्टेशन मंगरूळपीर हद्दीत मंगळवारी रात्री दरम्यान एक पिकअप वाहनांमध्ये अवैधरित्या सात जनावरे घेऊन जात असल्या बाबत पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी पाठलाग करून चोरट्या सह एकूण सात जनावरे ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

22-Dec-2021
पोलीस स्टेशन मानोरा- 35 लाखाच्या मुद्देमालासह दोन आरोपीस ताब्यात घेऊन केली धडाकेबाज कारवाही.
पोलीस स्टेशन मानोरा येथे 35 लाख रुपयाची सोयाबीनसह ट्रॅक विश्वासघात करून पळून घेऊन गेल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणेदार श्री सुनील जाधव व त्यांचे पथकाने 35 लाखाच्या मुद्देमालासह दोन आरोपीस ताब्यात घेऊन केली धडाकेबाज कारवाही.