Positive Stories


०३ - मे - २०२२
Handling Communal/ Caste Tensi
आगामी 'रमजान ईद'च्या पार्श्वभूमीवर SP श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा शहरात 'रूट मार्च'चे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये एकूण 10 अधिकारी, 01 SRPF प्लाटून व 150 अंमलदार समाविष्ट होते. वाशिम पोलीस दल कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज असून सर्व नागरिकांनी सण-उत्सव शांतपणे साजरे करावे व कायद्याचे पालन करावे, असे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.



२९ - एप्रिल - २०२२
एका महिलेचा विनयभंग करणाऱ्यास पो.स्टे. वाशीम ग्रा. अमलदारांनी दोन तासांत ताब्यात घेतले.
स्वामी ट्रॅव्हल्सने प्रवासादरम्यान एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या चालक व त्याचा मदतनीस यास पो.स्टे. वाशीम ग्रामीण येथील अमलदारांनी दोन तासांत तपास करत ताब्यात घेतले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.


