Positive Stories

२४ - मे - २०२२
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीस पॉस्को कायद्यांतर्गत '10 वर्षे कारावासा'ची शिक्षा
पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दाखल अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीस पॉस्को कायद्यांतर्गत '10 वर्षे कारावासा'ची शिक्षा झाली आहे. पॉस्को गुन्ह्यांमध्ये आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी वाशीम पोलीस दल प्रयत्नशील आहे.

२२ - मे - २०२२
87.2 लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना परत.
पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून 87.2 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; चोरीस गेलेला मुद्देमाल लवकर हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्यासाठी वाशिम पोलीस सतत प्रयत्नशील आहेत.

१९ - मे - २०२२
मूलभूत प्रशिक्षणामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या
पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव (लातूर) येथे मूलभूत प्रशिक्षणामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पोलीस अंमलदार अंकुश गजानन जायभाये यांचा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

१७ - जून - २०२२
सोयाबीन चोरट्यांना 34 लाखांच्या मुद्देमालासह इंदोर मध्यप्रदेश येथून अटक
सोयाबीन चोरट्यांना 34 लाखांच्या मुद्देमालासह इंदोर मध्यप्रदेश येथून अटक केल्याने कन्हेरगाव येथील श्री.गोपाल बंग यांनी पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.)यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन पोलीस दलाचे आभार मानले.

१६ - मे - २०२२
गंभीर गुन्ह्यांचा उत्कृष्टरित्या तपास व उकल, पो. अधि./ अंमल. चा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
गंभीर गुन्ह्यांचा उत्कृष्टरित्या तपास व उकल करत गुन्हेगारीस प्रतिबंध करणाऱ्या तसेच दोषसिद्धीसाठी विशेष मेहनत घेणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदारांचा सत्कार पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.


